चला, नगर शहरासाठी मतदान करूया!

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत सर्वेक्षण; १५ दिवसांत ५ हजार नागरिकांचा सहभाग
भिंतींवर स्वच्छता संदेश देण्यात आले आहेत
भिंतींवर स्वच्छता संदेश देण्यात आले आहेतsakal

अहमदनगर - देशाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहराला बक्षिसे मिळविण्यासाठी गेल्या दोन वर्षांत पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून प्रयत्न झाले. यापूर्वी थ्री-स्टार मानांकन मिळविले. आता फाइव्ह-स्टारकडे वाटचाल आहे. त्यासाठी नगरकरांना आपले मत नोंदविण्याची संधी ॲप किंवा बारकोडद्वारे मिळत आहे. गेल्या १५ दिवसांत तब्बल पाच हजार नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. पूर्वी शहरात कचराकुंड्या होत्या. त्यात मोकाट जनावरांचा मुक्त वावर होता. कचऱ्याची दुर्गंधी, प्लॅस्टिक पिशव्यांचा अतिवापर, हे चित्र कायम असायचे. आता मात्र शहर कचराकुंडीमुक्त झाले. दारोदारी घंटागाड्या दिसू लागल्या. सकाळीच ‘वासुदेव आला’ या गाण्याच्या तालावर ‘घंटागाडी आली’ हे गीत वाजू लागले. चौकाचौकांतील कचऱ्याचे ढीग नाहीसे झाले. नागरिकही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊ लागले. प्लॅस्टिकचा वापर कमी, ओला-सुका कचरा वेगळा करण्याबाबत अद्याप नागरिकांकडून खूपसा प्रतिसाद मिळत नसला, तरीही याबाबत जनजागृती होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून या वर्षी मनपा प्रशासन, पदाधिकारी देशात पहिल्या दहा शहरांत येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या वर्षी फाइव्ह-स्टार मानांकन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या उपक्रमाचा भाग म्हणून नागरिकांना सर्वेक्षणामध्ये भाग घेता येणार आहे. ते ॲप किंवा बारकोडच्या साह्याने ओपन होते. त्यात असलेल्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास तो डेटा थेट दिल्लीत संकलित होतो.

हे आहेत प्रश्न

  • तुम्हाला तुमचे शहर अधिक स्वच्छ वाटते का?

  • तुमच्या घरातून रोज कचरा गोळा होतो का?

  • तुम्ही ‘हर धडकन हैं, स्वच्छ भारत की’ हे स्वच्छता गीत ऐकले का?

  • कचरा संकलन सेवांबाबत तुम्ही समाधानी आहात का?

  • तुम्ही तुमच्या घरातील कचरा विलगीकरण करून देता का?

  • उघड्यावर शौच न करण्याबाबत लोक आता जागरूक झालेले आपण पाहतो का?

  • सार्वजनिक शौचालये पूर्वीपेक्षा अधिक सुलभ, स्वच्छ आहेत, असे तुम्हाला वाटते का?

  • शहरात स्वच्छतेबद्दल जागरूकता संदेश दिसत आहेत का?

  • भाजी आणण्यासाठी स्वतःची पिशवी घेऊन जाण्याबाबत तुम्ही संवेदनशील आहात का?

  • कचरा व्यवस्थापन जबाबदारीने काम करते, असे वाटते का?

या केल्या उपाययोजना

  • कचरासंकलनासाठी दारोदारी घंटागाडी

  • प्रमुख रस्त्यांची रोज सफाई

  • कचराकुंडीमुक्त शहर

  • कचरा विलगीकरण प्रकल्प

  • पाण्याची टाकी, भिंतींवर स्वच्छता संदेश

शहरस्वच्छतेबाबत आपल्या प्रतिक्रिया कळवा ‘सकाळ’च्या ९८८१७१८८६५ या व्हॉट्‌सॲप नंबरवर.

आपलं शहर सुंदर, स्वच्छ होण्यासाठी सर्वच नागरिकांचे चांगले सहकार्य लाभते. त्यामुळेच यापूर्वी मानांकन मिळू शकले. आताही फाइव्ह-स्टारसाठी आपण प्रयत्न करीत आहोत. मनपा पदाधिकारी, प्रशासनाकडून चांगले प्रयत्न होतात. नागरिकांनीही सर्वेक्षणात सहभागी होऊन आपल्या शहराला बक्षिस मिळवून द्यावे.

- रोहिणी शेंडगे, महापौर.

अहमदनगर महापालिकेने यापूर्वी दोन वेळा थ्री-स्टार मानांकन मिळविले आहे. आता फाइव्ह-स्टारसाठी प्रयत्न करीत आहोत. सर्व नागरिकांच्या साह्याने हे काम सुरू आहे. या सर्वेक्षणात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या नगरला मानांकन मिळवून द्यावे.

- यशवंत डांगे, उपायुक्त, मनपा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com