Ahilyanagar Crime: मतिमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला ‘नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप’; अहिल्यानगर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

DNA evidence leads to conviction in sensitive assault case India: मतिमंद दिव्यांग मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; डीएनए अहवालासह १५ साक्षीदारांच्या पुराव्यावर न्यायालयाचा कठोर निकाल, नैसर्गिक मृत्यूपर्यंत कारावास व ५० हजार दंड
Ahmednagar Court Delivers Strictest Punishment in Sensitive Abuse Case, Sets Legal Precedent

Ahmednagar Court Delivers Strictest Punishment in Sensitive Abuse Case, Sets Legal Precedent

sakal

Updated on

अहिल्यानगर: मतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी साहेबराव लक्ष्मण शिंदे (वय ५०, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) याला विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, तसेच ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद भोगण्याचे आदेश दिले आहेत. खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी. के. मुसळे यांनी काम पाहिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com