Ahilyanagar Crime : खातगाव टाकळीत दोन दारूअड्ड्यांवर छापा
राजेंद्र विलास पवार (वय २२, रा. खातगाव टाकळी) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील ४ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू व ४० हजार रुपये किमतीचे दारू बनविण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, असा ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Police raiding illegal liquor dens in Khatgaon-Takali; major seizure of illicit alcohol.sakal
नगर तालुका : नगर तालुक्यातील खातगाव टाकळी येथे नगर तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्या दोन दारूअड्ड्यांवर छापा घातला. या कारवाईत ८२ हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.