संगमनेर तालुक्यात श्रावणी बैलपोळ्याच्या सणासाठी साहीत्यानी थाटली दुकाने

सचिन सातपुते
Saturday, 15 August 2020

यंदा सर्वत्र मुबलक पावसामुळे यावर्षी तालुक्यातील शेतकरी समाधानी असला तरी श्रावणी बैलपोळयाच्या सणावर मात्र कोरोनाचे सावट आहे.शेवगाव (अहमदनगर) : यंदा सर्वत्र मुबलक पावसामुळे यावर्षी तालुक्यातील शेतकरी समाधानी असला तरी श्रावणी बैलपोळयाच्या सणावर मात्र कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शेतक-यांचा महत्वाचा सण असलेला बैलबोळा उत्साहाने साजरा करण्यावर कोरोनाच्या जमावबंदीचे विरजन पडले आहे. त्यामुळे प्रथमच गावोगावी भरणारा पोळा सुनासुना भासणार आहे.

शेवगाव (अहमदनगर) : यंदा सर्वत्र मुबलक पावसामुळे यावर्षी तालुक्यातील शेतकरी समाधानी असला तरी श्रावणी बैलपोळयाच्या सणावर मात्र कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शेतक-यांचा महत्वाचा सण असलेला बैलबोळा उत्साहाने साजरा करण्यावर कोरोनाच्या जमावबंदीचे विरजन पडले आहे. त्यामुळे प्रथमच गावोगावी भरणारा पोळा सुनासुना भासणार आहे.

वर्षातून एकदा येणारा बैलपोळा हा सण शेतकरी वर्गातील मोठा सण असतो. शेतीसाठी राबणा-या बैलाची मनोभावे पूजा करुन धनधान्याने घर भरणा-या काळ्या आईला नैवदय दाखवून त्यातून उतराई होण्याचा हा दिवस असतो. गेल्या तीन चार वर्षापासून तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने दरवर्षीचा श्रावण अमावस्येला येणारा पोळा हा सण दुष्काळात व कोरडा साजरा करण्याची वेळ तालुक्यातील शेतक-यांवर नेहमी येत असते.

यंदा मात्र जूनच्या सुरुवातीपासूनच तालुक्यात सर्वत्र समाधान कारक पाऊस आहे. ओढे,नदी नाले खळखळून वाहत आहेत. तर खरीपाची पिके ही जोमात आहेत. तर काही भागात अतिवृष्टीमुळे पिके जाण्याच्या बेतात असली तरी चांगल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र या सर्व आनंदाच्या क्षणी कोरोना विषाणूच्या संसर्गाने शेवगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांना ग्रासले आहे.

दिवसेंदिवस बाधीत रुग्णांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे ऐकीकडे पावसाने समाधानी असलेला शेतकरी व गावकरी वर्ग मात्र कोरोनाच्या दहशतीखाली आहे. गावोगावी असलेले छोटेमोठे व्यावसायिक टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे बैल पोळयासाठी लागणा-या साहीत्याची दुकाने बाजार पेठेत किरोकोळ विक्रेत्यांनी थाटलेली नाहीत. तर काही व्यावसायिकांनी ठेवलेल्या साहित्यास मागणी नसल्याने ते तसेच पडून आहेत.

शिवाय जमावबंदीचा आदेश सर्वत्र लागू आहे. तर दहिगाव ने, चापडगाव, ढोरजळगाव, फलकेवाडी, कोळगाव आदी गावे प्रतिबंधीत केलेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामिण भागात प्रथमच पोळा भरणार नाही. त्यामुळे शेतक-यांना घरच्या घरी हा सण साजरा करावा लागणार आहे.

1912 सालापासून शेवगाव शहरातील महात्मा सार्वजनिक वाचनालयासमोर पोळा भरतो. पूर्वी ग्रामपंचायतीकडून तर आता नगरपरीषदेकडून तेथे येणाऱ्या उत्कृष्ट पक्षूची निवड करुन त्याच्या शेतकरी मालकाचा सत्कार केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा सुरु आहे. मात्र यावर्षी प्रथमच ती कोरोनामुळे खंडीत होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Literature shops for Shravani Bullfighting Festival in Sangamner taluka