

Police officials at the farmer’s residence in Karjat taluka following the tragic incident.
कर्जत : खासगी सावकाराच्या तगाद्यास कंटाळून घुमरी (ता. कर्जत) येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. चंद्रहास गेणबा पांडुळे (वय ५१), असे त्या शेतकऱ्यांचे नाव आहे. याबाबत मिरजगाव पोलिस ठाण्यात अविनाश पांडुळे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत दादासाहेब अनभुले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.