
पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील संजय संभाजी पाठक (ता.11 नोव्हेंबर) रोजी दुचाकीवर पाथर्डीकडे जात होते. शाहपूरजवळ हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करून लुटले. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अहमदनगर : नगर-पाथर्डी रस्त्यावर शाहपूरजवळ दुचाकीस्वाराला लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तरुणास अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला. करण सोमनाथ रोकडे (वय 20, रा.आडगाव, नाशिक) असे त्याचे नाव आहे.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील संजय संभाजी पाठक (ता.11 नोव्हेंबर) रोजी दुचाकीवर पाथर्डीकडे जात होते. शाहपूरजवळ हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करून लुटले. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांचे पथक तपास करीत असताना, गुन्ह्यातील मोबाईल रोकडे वापरीत असल्याचे समोर आले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
त्यानुसार, पथकाने त्याला नाशिक येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत, मोबाईल विकत देणारे जॉन चलन पडेची, साहिल सुरेश म्हस्के ऊर्फ मोन्या पाईकराव, हर्ष सुरेश म्हस्के ऊर्फ टोण्या पाईकराव, अशी आरोपींची नावे सांगितली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता, ते खुनाच्या गुन्ह्यात नाशिक जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असल्याचे समजले.