शेवगाव झाले लॉकडाउन...असे आहेत नियम

 Lockdown in Shevgaon
Lockdown in Shevgaon

शेवगाव : शेवगाव शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण शहर ता.२८ पर्यंत दहा दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला आहे. या कालावधीतील सुचना व व्यवहाराबाबत तहसीलदार अर्चना भाकड - पागिरे यांनी स्वतंत्र आदेश काढून शहरवासीयांना त्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी शेवगाव शहरात२८ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळात शहरातील रस्त्यावर, गल्लीत संचार करणे, खाजगी वाहनांची ने आण करणे, चौकात थांबणे, गर्दी करणे अशा कृत्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणांसाठी खाजगी चारचाकी वाहनातून चालक व अन्य दोघांना तर दुचाकीवरून केवळ चालकालाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

नगरपरिषद क्षेत्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविदयालये शासकीय आदेशानुसार सध्या बंद असली तरी दहा दिवसांसाठी शैक्षणिक - प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस, मिटिंग यांस मनाई राहील. मात्र आँनलाईन शैक्षणिक उपक्रमास परवानगी देण्यात आली आहे‌. व्यावसायिक संकुले, मॉल, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, बार, धार्मिक प्रार्थनागृहे यासारखी ठिकाणे पूर्वीप्रमाणेच बंद राहतील.

सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर येण्यास मनाई राहील.तसेच या काळात शहरातील चहा दुकाने, रसवंती, उपहारगृहे, हॉटेल, परमिट रुम, थंड पेय दुकाने, पानटपरी, केस कर्तनालय व ब्युटीपार्लर इत्यादी दुकाने, राष्ट्रीयकृत व  सहकारी बँका, पतसंस्था, वाईन शॉप बंद राहतील.

ही दुकाने राहतील सुरू

अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा मालाची व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला विक्रेते यांना सकाळी ८ ते ११ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. तर दूध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत परवानगी दिली आहे. हा आदेश शेवगाव शहरासाठी लागू असून नियमभंग करणारा विरुद्ध भारतीय दंड संहीता व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार भाकड यांनी दिला आहे.

शहरातील व मुंगी येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ४९ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात ३८ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले अाहे. त्यांच्या चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.

वाहनांची तपासणी

संपूर्ण शहर दहा दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला. पहिल्याच दिवशी आज रविवारी नगर, तिसगाव, गेवराई व नेवासे रस्त्यावर बँरीकेटस् टाकून वाहनांची तापसणी करण्यात आली. या तपासणीत दुचाकी व मोठया अशा सुमारे ४३ वाहनांवर कारवाई करुन २७ हजार २०० रुपये दंड वसुल करण्यात आला. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, वाहतुक पोलीस राजेंद्र ढाकणे व भाऊसाहेब खेडकर आदी सहभागी झाले होते. 

४९जणांचे नमुने पाठवले

शहरातील व मुंगी येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ४९ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील कोवीड केअर सेंटरमध्ये ३८ जणांना ठेवण्यात आले असून त्यांच्या चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विलगीकरण कक्षात १२६ व्यक्ती आहेत. कालावधी संपलेल्या व्यक्ती २४५६ असे सुमारे २५८० व्यक्ती आतापर्यंत विलगीकरण कक्षात होते. आजपर्यंत २१ रुग्ण उपचार घेत असून २० रुग्ण बरे झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com