esakal | कोल्हार भगवतीपूरला दर शनिवारी लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

कोल्हार भगवतीपूरला दर शनिवारी लॉकडाउन

sakal_logo
By
सुहास वैद्य

कोल्हार:- कोविड-१९या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनलॉक केले असतानाच कोरोनाचा संसर्ग वाढू नये. म्हणून कोल्हार भगवतीपुर (ता.राहता) येथे दर शनिवारी जनता कर्फ्यू राहणार आहे. ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांच्या आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते व स्वेच्छेने हा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला.

इतर दिवशी दुकाने नेहमीप्रमाणे चालू राहतील. मात्र, शुक्रवारचा आठवडे भाजी बाजार बंद राहील. तसेच गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल कोल्हार मधील दुकाने सील केल्यानंतर आज विशेष बैठक बोलवीण्यात आली होती. (Lockdown to Kolhar Bhagwatipur every Saturday)

हेही वाचा: ५६व्या वर्षी दिली परीक्षा, पीएसआय बनून केली स्वप्नपूर्ती

माजी सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय झाला. त्यांनी सर्व व्यापार्यांची मते जाणून घेतली. तसेच जनता कर्फ्यूबाबत ग्रामपंचायतीची किंवा इतर प्रशासनाची कोणतीही सक्ती नसल्याचे स्पष्ट केले.

ॲड. खर्डे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष येऊन दुकाने सहन करावी लागन्याची वेळ येते. हे गावाच्या दृष्टीने योग्य नाही. व्यापाऱ्यांना एकच एक गोष्ट किती वेळा सांगायची. वास्तविक व्यापाऱ्यांचा लोकांशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांनी त्यांना आदराने वागणूक द्यावी.असे ॲड. खर्डे म्हणाले.

व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी यांनी व्यापाऱ्यांच्या लसीकरण प्राधान्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. योगेश कोळपकर म्हणाले,बंद बाबत सर्वांना सारखा नियम ठेवला पाहिजे.कारवाई करताना छोटे मोठे व्यापारी असा भेदभाव केला असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवकुमार जंगम यांनी गावात नियमांची अंमलबजावणीबाबत ग्रामपंचायतीची जबाबदारी मोठी असल्याचे सांगितले.

ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे म्हणाले, दुकानदारांनी दर पंधरा दिवसांनी आरटीपिसीआर चाचणी करून तपासणीचा अहवाल दुकानात ठेवावा.या बैठकीला ज्येष्ठ व्यापारी सुधाकर काळे, सुरेश निबे,पंढरीनाथ खर्डे, श्रीकांत बेद्रे, पप्पू मोरे, शिवाजी निकुंभ, सचिन मोहोडकर, जावेद शेख,गोरख खर्डे व सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे उपस्थित होते. (Lockdown to Kolhar Bhagwatipur every Saturday)