Nilesh Lanke : दहा मिनिटांत तुमचा बाप येतोय

‘त्या ‘पीआय’ला (पोलिस निरीक्षक) जाऊन सांगा, दहा मिनिटांत तुमचा बाप येतोय,’ असा थेट इशारा नीलेश लंके यांनी दिला.
MLA Nilesh Lanke
MLA Nilesh LankeEsakal

अहमदनगर - ‘त्या ‘पीआय’ला (पोलिस निरीक्षक) जाऊन सांगा, दहा मिनिटांत तुमचा बाप येतोय,’ असा थेट इशारा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी दिला. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लंके हे काल रात्री केडगाव येथील प्रचारसभेत बोलत होते. त्याचवेळी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने लंके यांच्या कार्यकर्त्यांना नियमापेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही सभा सुरू असतानाच त्यांना ही माहिती मिळाली. लंके यांनी सभेतच कारवाई करणाऱ्या पोलिसांना थेट इशारा दिला.

अहमदनगर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्याने लंके यांचा पारा चढला. ते म्हणाले की, जिल्ह्यात माझ्या विरोधात पोलिस, जिल्हा परिषद, महसूल या यंत्रणांचा वापर केला जात आहे. कुणीतरी त्या ‘पीआय’ला जाऊन सांगा की, दहा मिनिटांत तुमचा बाप येतोय, असा इशारा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com