esakal | लोणी: तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी: तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद

लोणी: तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी: लोणी बुद्रुक शिवारातील हसनापूर रस्त्यालगत हॉटेल साई छत्रपती येथे तीन वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबारातील आरोपी अखेर जेरबंद करण्यात लोणी पोलिसांना यश आले आहे. फरदीन आब्बू कुरेशी (वय १८) यास संगनमत करून बंदुकीची गोळी घालून जिवे मारण्याची घटना घडली होती.

यातील आरोपी अक्षय दत्तात्रय बनसोड (वय २५, रा. लोणी बुद्रुक) हा गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. मात्र, हा आरोपी लोणीत आला असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केल्याची माहिती लोणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिली.

loading image
go to top