ब्रेकिंग ः नगरमध्ये आज ४१चा लॉट...मुकुंदनगरला पुन्हा एंट्री

Lot of 41 corona patients in Ahmednagar today
Lot of 41 corona patients in Ahmednagar today
Updated on: 

नगर ः नगर जिल्ह्यात ठराविक स्पॉट असे आहेत की तिकडे रोज कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आहेत. त्या खालोखाल नगर शहराचा समावेश आहे. आज सायंकाळी आलेल्या अहवालात नगर शहरातील सर्वाधिक रूग्ण होते.

सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३८४ इतकी झाली आहे, तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ६६६ इतकी झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या १९ रुग्णांमध्ये नगर शहरातील १२, नगर ग्रामीण ०३, श्रीगोंदा ०२, राहुरी तालुक्यातील ०१ आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

नगर शहरात इथे सापडले रूग्ण

नगर महापालिका क्षेत्रात मुकुंदनगर, गवळी वाडा, दिल्ली गेट, आंबेडकर चौक, मंगल गेट, सम्राट नगर, समतानगर, पाइप लाइन रोड, सिद्धार्थ नगर, स्वास्थ्य हॉस्पिटल आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळून आले.
याशिवाय नागापूर येथे ०१, हिंगणगाव ०१ आणि रुई छत्तिशी येथे ०१ रुग्ण आढळून आला. 

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एक रुग्ण आढळून आला. भिंगार येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला.
श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा आणि मांडवगण येथील प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळून आला.


उपचार सुरू असलेले रुग्ण: ३८४, बरे झालेले रुग्ण: ६६६, मृत्यू: २६,एकूण रुग्ण संख्या: १०७६

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

‘Mula Dam Water,
Balasaheb Thorat and Sujay Vikhe Share the Same Platform
Bhingar Cantonment Development Nilesh Lanke Directs Action on Fort Beautification Lake Cleaning Hospital and Teachers
Bhandardara Dam Centenary Tourism Plan E Tender For Key Sites And Krishnavanti Rest House On 49 Year Lease Announced
Marathi News Esakal
www.esakal.com