
पाथर्डी : अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या तरुणाला व संबंधित मुलीला पोलिस व मुलीच्या नातेवाईकांनी गांधीगिरी करत ताब्यात घेतले. या घटनेतील मुलाला मुलीच्या नातेवाईकांनी तुमच्या दोघांचे लग्न लाऊन देतो, असे सांगत ठरलेल्या लग्नस्थळी बोलाविले. यावेळी वऱ्हाडी बनून आलेल्या पोलिसांनी या प्रेमी युगुलाला अलगद ताब्यात घेतले.