अरणगाव, खंडाळा, खडकीला कमी दाबाने वीजपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

महावितरणचे शहर तथा ग्रामीणचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांच्याकडे नगर तालुक्‍यातील चारही गावांतील विजेचा प्रश्‍न मांडला.

नगर तालुका ः अरणगाव, जाधववाडी, खंडाळा, खडकी या गावांना बाबुर्डी बेंदच्या उपकेंद्रावरून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे वीजपंप बंद पडत आहेत.

या विरोधात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयात जोरदार आंदोलन केले. 

महावितरणचे शहर तथा ग्रामीणचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांच्याकडे नगर तालुक्‍यातील चारही गावांतील विजेचा प्रश्‍न मांडला. यावर प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन धर्माधिकारी यांनी कार्ले, हराळ व भोर यांना दिले. त्यानुसार आज दुपारी धर्माधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अरणगाव, जाधववाडी, खंडाळा व खडकीतील शेतीपंप व रोहित्रांची पाहणी केली.

धर्माधिकारी यांनी अकोळनेर येथील उपकेंद्रामधून वीजभार जोडण्याच्या सूचना संबंधित महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Low pressure power supply to Arangaon, Khandala, Khadki