
अहिल्यानगर: जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी स्कीन’च्या वाढत्या बाधेमुळे शेतकरी धास्तावले आहेत. जिल्ह्यात आजवर तब्बल सोळाशेहून अधिक जनावरे बाधित झाली असून त्यातील १ हजार ४० बरी झाली आहेत. मात्र, ४७ जनावरे दगावली आहेत. आज ५२२ जनावरांवर उपचार सुरू आहेत. १७५ प्रतिबंधित केंद्रे जाहीर केली आहेत.