

Madhu Kambikar Marathi Folk Artist Remembered for Her Contribution to Kambi Village and Her Unfulfilled Desire for Recognition
sakal
बोधेगाव (जि. अहिल्यानगर): ज्या गावाच्या मातीत बालपण गेले, ज्या महालक्ष्मी देवीच्या चरणी श्रद्धा जडली आणि ज्या गावाच्या नावाने आयुष्यभर ओळख जपली, त्या कांबीशी मधूताई कांबीकर यांचे नाते केवळ जन्मभूमीचे नव्हते, तर ते काळजाचे होते. प्रसिद्धीच्या झगमगाटातही गावाची ओढ कधी विसरल्या नाहीत.