
अहिल्यानगर : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले आणि राहाता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.