Devendra Fadnavis: ‘काळजी करू नका, जगताप कुटुंबीयांच्या पाठीशी': मुख्यमंत्री फडणवीस; कुटुंबीय भावुक, नेमकं काय म्हणाले ?
फडणवीस यांनी धीर दिला. (कै.) जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. फडणवीसांचे घरी आगमन होताच जगताप कुटुंबीयांचे डोळे पाणावले. या वेळी सर्वजण भावुक झाले. (कै.) जगताप यांच्या पत्नी पार्वतीबाई जगताप यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
CM Devendra Fadnavis consoles an emotional Jagtap family, assures full government support.Sakal
अहिल्यानगर : ‘‘काळजी करू नका, जगताप परिवाराच्या मागे मी कायम उभा असणार आहे. काकांचे योगदान जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप कुटुंबीयांचे सांत्वन केले.