
अहिल्यानगर : जिल्ह्यातील खेळाडूंची नाळ लाल मातीशी जोडली गेली असून, अहिल्यानगरला कुस्तीचा वारसा आहे. अनेक कुस्तीपटूंनी राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. आता जिल्ह्यातून ऑलिंपिकवीर घडला पाहिजे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना चारचाकी आणि चांदीची गदा बक्षीस म्हणून मिळणार आहे.