अहमदनगर : ‘महाराष्ट्र केसरी’ निवडचाचणीत डाव-प्रतिडाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Kesari selection test Nepti wrestling ground

अहमदनगर : ‘महाराष्ट्र केसरी’ निवडचाचणीत डाव-प्रतिडाव

अहमदनगर : येथे बिरोबा यात्रोत्सवानिमित्त प्रथमच निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान घेण्यात आले. नेप्ती (ता. नगर) येथील साई संजीवनी प्रतिष्ठानने आतापर्यंत अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आरोग्यविषयक, तसेच कुस्ती कला जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र केसरी जिल्हा निवडचाचणी गावात यशस्वी करून दाखविली. त्यानंतर हगामा न भरवता नामवंत मल्लांच्या, अडीच हजारांपासून ते एक लाखापर्यंत इनामी कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले.

प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान अनिल ब्राह्मणे विरुद्ध पैलवान हनुमान शिंदे यांच्यात झाली. माजी मंत्री शिवाजी कर्डिले व श्री साई संजीवनी प्रतिष्ठानचे सदस्य, तसेच ग्रामस्थांच्या हस्ते ती लावण्यात आली. दोन क्रमांकाची कुस्ती पैलवान ऋषी लांडे विरुद्ध आशिष वावरे यांच्यात ७१ हजार रुपये इनामासाठी झाली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती अनिल लोणारे विरुद्ध सुरेश पालवे यांच्यात झाली. मैदानात ४१ कुस्त्या निकाली झाल्या.

या कुस्ती मैदानाला महाराष्ट्र चॅम्पियन अनिल गुंजाळ, बंटी गुंजाळ पोपट शिंदे, संजय गिरवले, अनिल डोंगरे, सुदर्शन कोतकर, सुभेदार शंकर खोसे, सोमनाथ राऊत, बंडू शेळके, नगरसेवक गणेश कवडे, पैलवान नाना डोंगरे, उद्योजक सचिन कोतकर, नगरसेवक युवराज पठारे, संदीप कावरे उपस्थित होते. रघुनाथ होळकर, छबू फुले, दादू चौगुले, एकनाथ होले, सीताराम जपकर, डॉ. शांताराम साळवे, बाबा भोर, गजानन होळकर, छबू जपकर, बंडू जपकर, मल्हारी कांडेकर, बबन कांडेकर, राजू भुजबळ, भाऊ सप्रे, पोपट कोल्हे, विठ्ठल चौरे यांनी मैदानासाठी मेहनत घेतली.

Web Title: Maharashtra Kesari Selection Test Nepti Wrestling Ground

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top