
राहुरी : माहेगाव येथे शेतातील विजेचा खांब उभारताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. नितीन भाऊसाहेब कावरे (वय १९, रा. माहेगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात निष्काळजीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठेकेदार नानासाहेब चंद्रकांत पवार (रा. माहेगाव), शेतमालक निखिल प्रभाकर चौरे (रा. अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत.