महाराष्ट्र हमारा घर है...प्रेमामुळे परप्रांतीयांचा पाय निघेना

leabour travling
leabour travling

संगमनेर ः परप्रांतीयांचे जथ्थेच्या जथ्थे गावाकडे निघाले आहेत. या भूमीने त्यांना रोजगारासोबत प्रेमही दिलं. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रच आपलं घर वाटू लागलं आहे. ते तशी भावना व्यक्त करीत आहेत.

साब, महाराष्ट्र हमें अपने घर जैसा लगता है... बहुत प्यार दिया इस धरतीने... कोरोना की वजहसे कुछ दिनों के लिए गाँव जा रहे हैं... मगर यकिन मानिये हम फिर लौटकर आयेंगे... थँक्य़ू थोरात साहाब... त्या परप्रांतीयांच्या कातरस्वराने यशोधनही गहिवरले.

संगमनेरात अडकलेल्या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी सहीसलामत पोहोचवण्यात आलं. गावी पोचताच रामविलास वर्मा या मजूराने यशोधन कार्यालयात फोन करुन महाराष्ट्र आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 
कोरोनाच्या विश्वव्यापी संकटाने जगाचा चेहरामोहरा बदलला आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाल्याने सामान्य कष्टकरी, मजूर वर्ग, सामान्य मध्यमवर्गियांसह कारखानदारांचेही कंबरडे मोडले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी पुकारलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. महिनाभर कसातरी दम काढलेल्या परप्रांतिय मजूरांनी, जगायचे कसे या विवंचनेत असल्याने गावी जाण्याचा मार्ग पत्करला. वाहतूक बंद असल्याने हजारो किलोमीटरचे अंतर या मजूरांनी पायी, सायकल अथवा मिळेल त्या साधनाने कापले. रस्त्यातील दुकाने बंद असल्याने उपाशीपोटी रात्रंदिवस नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन मजुरांचे जथ्थे चालत होते.

संगमनेर तालुक्यात अडकलेल्या सुमारे एक हजार 662 मजूरांना स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी दोन वेळेस जेवणाचे डबे, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. काबाडकष्ट करुन काणाऱ्या या मजुरांनी महाराष्ट्रीयांना त्रास देण्यापेक्षा घराचा रस्ता धरला.

या मजुरांना तालुक्यातील गावांमध्ये मिळालेले प्रेम व आपुलकीमुळे हे मजूर भावनाविवश झाले होते. तर काही मजूरांना नगरच्या रेल्वे स्थानकापर्यंत पोचवण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीने अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या बसने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड या ठिकाणी जाणाऱ्या मजुरांच्या जेवण, औषधे व प्रवासाची व्यवस्था केली.

दहा वर्षांपासून महाराष्ट्रात कामधंद्यासाठी आलेल्या या कष्टकरी मजूरांनी महाराष्ट्रात मिळालेले प्रेम, आपुलकी इतरत्र कुठेही न मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ही मदत कधीच न विसरता येण्यासारखी असल्याचे सांगत, हे संकट संपताच आम्ही पुन्हा या कुटूंबात परत येणार असल्याची व येथील विकासकामात योगदान देणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com