Brown Sugar : कोपरगावात कॅरमलाइज्ड ब्राऊन शुगरची निर्मिती; देशातील पहिला उत्पादक

सहकार महर्षी कोल्हे कारखाना ठरला देशातील पहिला उत्पादक
kolhe sugar factory make Caramelization Brown Sugar shirdi business
kolhe sugar factory make Caramelization Brown Sugar shirdi business sakal

शिर्डी : सुगंधी साखर व कमतरता असणाऱ्या जीवनसत्त्वाची जागा भरून काढू शकणाऱ्या साखरनिर्मितीचे संशोधन करणाऱ्या कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने यंदा, कुठलेही रसायन नसलेल्या कॅरमलाइज्ड ब्राऊन शुगरची निर्मिती केली.

kolhe sugar factory make Caramelization Brown Sugar shirdi business
Ahmednagar : तेरा गावांमधील शेतकरी आक्रमक, प्रशासन नरमले; ग्रामस्थांमुळे वाळू डेपो निविदा स्थगित

कच्च्या साखरेवर विशिष्ट प्रक्रिया करून अशी साखर निर्माण करणारा हा देशातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरला आहे. या उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या उपस्थितीत आज या कॅरमलाइज्ड ब्राऊन शुगरच्या विक्रीस सुरवात झाल्याचे जाहीर करण्यात आले.

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले, की भारतात आरोग्यविषयक जाणीव वृद्धिंगत होते आहे. साखर खाताना काळजी घेतली जात आहे. बाजारातील साध्या साखरेत सल्फरसह अन्य रसायने असतात. आम्ही उत्पादित केलेली कॅरमलाइज्ड ब्राऊन शुगर ही केमिकल-फ्री आहे.

कच्च्या साखरेवर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून ही साखर तयार केली जाते. तिची चव कायम ठेवण्यासाठी टेस्टर नियुक्त केलेले असतात. तुलनेत कमी गोडी व स्वाद बोर्नव्हिटासारखा आहे. जमिनीतून उसाच्या रसात आलेल्या रासायनिक द्रव्याव्यतिरिक्त तीत कुठल्याही रासायनिक द्रव्यांचा वापर केलेला नाही. त्यामुळे तुलनेत ही साखर खाण्यासाठी बऱ्यापैकी सुरक्षित आहे.

पहिल्या टप्प्यात दरमहा दहा मेट्रिक टन कॅरमलाइज्ड शुगर देशातील बाजारपेठांत विकली जाईल, असा आमचा सर्वेक्षणावर आधारित अंदाज आहे. या साखरेचा दर एकशे पंधरा रुपये प्रतिकिलो इतका आहे.

kolhe sugar factory make Caramelization Brown Sugar shirdi business
Ahmednagar ST Stand : हुश्‍श ! बसस्थानके होणार सुंदर; राज्यात मिळणार दोन कोटींची बक्षिसे

कॅरमलाइज्ड ब्राऊन शुगरची निर्मिती करणारा आमचा कारखाना हा देशातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्याच्या प्रयोगशाळेत सध्या सुंगधी व जीवनसत्त्वयुक्त साखरेच्या निर्मितीबाबत संशोधन सुरू आहे. चार-पाच प्रकारचा सुगंध असलेली साखरनिर्मिती आणि ज्या व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, ती भरून काढू शकणाऱ्या विविध व्हिटॅमिन्सचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या साखरेची निर्मिती, हे आमचे आगामी उद्दिष्ट आहे.

- विवेक कोल्हे, अध्यक्ष, कर्मवीर शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कोपरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com