esakal | विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा. विश्वास देशमुख यांचे निधन

बोलून बातमी शोधा

 vishwas digambarrao deshmukh

विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा. विश्वास देशमुख यांचे निधन

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ (अहमदनगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अवजारे व यंत्र योजनेचे सहाय्यक प्राध्यापक विश्वास दिगंबरराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये मधून डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या 40 वर्षाच्या इतिहासात सर्वांना सुपरिचित असलेले व विद्यार्थीप्रिय, मनमिळावू, प्रचंड अभ्यासू शेतकऱ्यांच्या कृषी अवजारांच्या विषयीचे अभ्यासक प्रा. देशमुख यांच्या जाण्याने कृषी अवजारे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषियंत्रांच्या तसेच अवजारांच्या संशोधनात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे ते रिसर्च गाईड होते, अशा शेकडो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूने जगाचा निरोप घेतला. दि न्यू इंडिया इन्शुरन्सच्या राहुरी शाखेतील प्रशासकीय अधिकारी प्रतिक देशमुख यांचे ते वडील होतं. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.