मिरजगाव ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी-भाजपत टाय, आता तीन अपक्षच काय ते ठरवणार

Mahavikas Aghadi-BJP tie in Mirajgaon Gram Panchayat
Mahavikas Aghadi-BJP tie in Mirajgaon Gram Panchayat
Updated on

कर्जत : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची असणाऱ्या व संपूर्ण तालुक्याचे निकालाकडे लक्ष लागलेल्या मिरजगाव ग्रामपंचायतीत विद्यमान ज्येष्ठ नेते डॉ. आदिनाथ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, सेना नेते अमृत लिंगडे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी व विरोधी सरपंच नितीन खेतमाळीस व बाजार समिती संचालक लहू वतारे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाला समसमान प्रत्येकी सात जागा निवडून आल्या आहेत.

डॉ. गोरे पती-पत्नीचा विजय

येथे तीन अपक्ष विजयी झाले असून सत्तेची चावी त्यांच्या हाती आली आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व विद्यमान उपसरपंच अमृत लिंगडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. सरपंच नितीन खेतमाळीस व त्यांची पत्नी सुनीता आणि डॉ. पंढरीनाथ गोरे व त्यांची पत्नी डॉ. शुभांगी हे पति-पत्नी यांनी विजय साकार केला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाल्यापासून तालुक्याचे लक्ष मिरजगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागले होते. या निवडणुकीत तालुक्यात प्रथमच महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला होता.

येथे माजी सरपंच जेष्ठ नेते डॉ आदिनाथ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, सेना नेते उपसरपंच अमृत लिंगडे, राष्ट्रवादी डॉकटर्स सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोरडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीविरुद्ध विद्यमान सरपंच नितीन खेतमाळीस व बाजार समिती सदस्य लहू वतारे यांच्या पॅनलमध्ये अतिशय चुरशीच्या लढती होत्या. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढविण्याचा आल्या. या निवडणुकीत वॉर्ड चारमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडूळे व व्यापारी बापू कासवा यांच्या नेतृत्वाखाली नवयुग अपक्ष म्हणून उभे ठाकले. त्या वॉर्डात तिन्ही अपक्ष निवडून आले. दोन्ही प्रमुख पॅनलला समसमान जागा मिळाल्याने येथील सत्तेची चावी अपक्षांच्या हाती आली आहे.

मिरजगाव ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः नितीन खेतमाळीस, डॉ. पंढरीनाथ गोरे, त्रिवेना फरताडे, चंद्रकांत हुमे, सुनीता खेतमाळीस, मनीषा बावडकर, संदीप बुद्धिवंत, डॉ. रजनी कोरडे, सागर पवळ, संगीता वीर पाटील, अंजुम अत्तर, लहू वतारे, संगीता कोरडे, डॉ. शुभांगी गोरे, अनिता कोल्हे, प्रकाश चेडे व उज्ज्वल ला घोडके.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com