esakal | जाहिरातीतील फोटोवरून महाविकास आघाडीत धुसफूस...काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांचे ट्विट
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi dissatisfied with the advertisement

महाजाॅब्सच्या जाहिरातीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षातीलच नेत्यांचे छायाचित्र छापले.

जाहिरातीतील फोटोवरून महाविकास आघाडीत धुसफूस...काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांचे ट्विट

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय? सरकार पडणार तर नाही ना? अशा रोज बातम्या येत असतात. मात्र, खासदार संजय राऊत यांच्यासारखे नेते असं काही होणार नाही असे म्हणून सर्वकाही अलबेल असल्याचे दाखवून देतात. काल पुन्हा धुसफूस असल्याचे समोर आलं. 

काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडी आहे तर सर्व योजनेंमध्ये तिन्ही पक्षांना सहभागी करून घ्यायला हवे. असे होत नसेल ते चुकीचे आहे, अशा आशयाचे ट्विट तांबे यांनी केले आणि पुन्हा आघाडीत सर्व अलबेल नसल्याचे दाखवून दिले.

महाजाॅब्सच्या जाहिरातीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षातीलच नेत्यांचे छायाचित्र छापले. हा प्रकार महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांच्या ट्विटर अंकाऊंटवर पोस्ट करीत 'महाजाॅब्स' ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची?

आघाडी होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी ही माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यापर्यंत पोहोचवली. देसाई यांनी या ट्विटमुळे वादंग होण्यापूर्वीच मंत्रिमंडळात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे या बाबत दिलगिरी व्यक्त केली. ही माहिती थोरात यांनीच माध्यमांना दिली. मात्र, ते सांगत असताना थोरात यांनीही कानपिचक्या दिल्याच.

ती चूकच होती, जे किमान कार्यक्रमात ठरले आहेत त्यानुसार सर्व चालले गेले पाहिजे. याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. राज्य सरकारच्या धोरणाची जाहिरात आहे. 

तीनही पक्ष जाहिरातीत दिसावे ही अपेक्षा आहे.
तांबे व सातव हे काॅंग्रेसचे तरूण पदधिकारी आहेत. त्यांच्या भावना तीव्र आहेत. मात्र, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ती मांडली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लक्ष द्यायला हवे. मात्र, उद्योगमंत्री यांनीही याबाबत 
चुक झाली असल्याचे मान्य करून दिलगिरी व्यक्त केल्याने हा विषय संपला आहे, असे थोरात म्हणाले.

संपादन - अशोक निंबाळकर