

Tension brews in Shevgaon as BJP and NCP gear up for a possible head-to-head contest within Mahayuti.
Sakal
-सचिन सातपुते
शेवगाव : तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांचे व आठ पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यानुसार इच्छुक मातब्बर उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. पक्षीय पातळीवर तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी यांच्यातच खरी लढत होणार असली, तरी वैयक्तिक पातळीवर त्या राजकीय संघर्षास घुले विरुद्ध राजळे, अशीच किनार असणार आहे. मात्र, राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील हे दोन्ही घटक पक्ष असल्याने राज्यस्तरावरील युती-आघाडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.