

Police Tighten Net Around Foeticide Network; Fresh Revelations Emerge After Arrest
sakal
श्रीरामपूर: अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या पिंपरी निर्मळ (ता. राहाता) येथील बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाची पाळेमुळे अधिक खोलवर गेली आहेत. पोलिसांना चकवा देऊन गेल्या १०-१२ दिवसांपासून पसार असलेल्या जालिंदर रामदास बोरुडे (वय ४०, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदे) या मेडिकल चालकाला पोलिसांनी शिताफीने हातवळण (ता. नगर तालुका) शिवारातून ताब्यात घेतले. त्याच्या महागड्या कारमधून पोलिसांनी पाचवे बेकायदा सोनोग्राफी मशिन जप्त केले आहे.