Ahilyanagar Crime: माेठी कारवाई! 'चोरीचे २४ लाखांचे सोने जप्त'; एलसीबीकडून घरफोडी करणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद

LCB’s major success in cracking house robbery case : पथकाने कर्जत तालुक्यात आरोपींचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले. आरोपी मिलिंद भोसले याची अधिक चौकशी केली असता, त्याने साथीदारांसह अहिल्यानगरसह घारगाव, श्रीरामपूर, संगमनेर, पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यांमध्ये घरफोडीचे १६ गुन्हे केल्याची कबुली दिली.
LCB Nabs Housebreaking Gang, Seizes Gold Worth ₹24 Lakh
LCB Nabs Housebreaking Gang, Seizes Gold Worth ₹24 LakhSakal
Updated on

अहिल्यानगर : पुणे, सातारा, नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून फरार झालेल्या आंतर जिल्हा टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून सुमारे २४ लाख रुपये किमतीचे अडीचशे ग्रॅम चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी १६ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com