अकोलेत पावसाने मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Major damage caused by rains in Akole Ahmednagar

अकोलेत पावसाने मोठे नुकसान

अकोले - प्रवरा, मुळा, आढळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुळा पाणलोट क्षत्रतील कोथळे (१८२ दशलक्ष घनफूट), शिरपुंजे (देव हंडी, १५५) व आढळा पाणलोट क्षेत्रात पाडोशी (१४६ दशलक्ष घनफूट) ही जलाशये पूर्ण क्षमतेने भरली आहेत. सर्वाधिक पाऊस घाटघर व रतनवाडी येथे नऊ इंच पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महसूल विभागाने पंचनामे सुरू केले आहेत.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भंडारदरा जलाशयात वेगाने पाण्याची आवक होत असून, जलाशयात सकाळी सहा वाजता ४६५६ दशलक्ष घनफूट साठा होता २४ तासात ७६० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. वाकी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून, कृष्णवंती नदीत १०२२ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे निळवंडे जलाशयात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोदणी वीज प्रकलपात वीजनिर्मिती सुरू झाली आहे. निळवंडे जलाशयात ४१७ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून, जलाशयात ४०५१ दशलक्ष घनफूट साठा आहे, तर मुळा नदीपात्रात ९१५५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील कोथळा, देवहांडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे मुळा जलाशयाकडे पाणी झेपावले आहे.

कोतूळ येथील नदीला पूर आला असून, पूल पाण्यात गेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. मुळा क्षेत्रात असलेल्या जानेवाडी, कुमशेत रस्त्यावर दरडी कोसळल्या असून, वाहतूक बंद आहे. विजेचे खांब पोल पडल्याने वीज दोन दिवसांपासून गायब आली आहे. बांध फुटले असून, भात रोपे पाण्याखाली गाडले गेलेले आहे, अशी माहिती सरपंच सयाजी अस्वले यांनी दिली आहे. फोफसंडी येथे दहा इंच पाऊस झाल्याने त्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रतनवाडी घाटघर, साम्रद ही धुक्यात हरवलेली गावे असल्याचे दिसून आले.

चोवीस तासांतील पाऊस

भंडारदरा २०९ (९४२), घाटघर २३० (१४८९), रतनवाडी २२९(१५०१), वाकी १६७ (६९०), निळवंडे १२९ (४६६), अकोले ४१ (२४६), आढळा १० (९०) मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: Major Damage Caused By Rains In Akole Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top