

Police Tighten Noose Around Gender Testing Racket; More Arrests Likely After Fresh Seizure
sakal
श्रीरामपूर : पिंपरी निर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या आंतरजिल्हा रॅकेटचा अतिशय बारकाईने तपास करत असताना पोलिसांनी पुण्यातून अटक केलेल्या वाघोली येथील डॉ. अतुल जाधव याच्याकडून बेकायदा गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे सहावे अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन जप्त केले.