esakal | लग्नाच्या साईटवरून नाशिकच्या 'लखोबा लोखंडे'चा मुलींसोबत लग्नखेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Man arrested for cheating on girls

या लखोबाने अनेक मुलींची विवाह करून त्यांची फसवणूक केली आहे. एकप्रकारे त्याने लग्नखेळच मांडला होता. परंतु नगरच्या पोलिसांनी त्याने कोणा दुसऱ्या फसवून लग्नबेडी टाकण्यापूर्वी त्याच्या हातात खऱ्याखुऱ्या बेड्या अडकवल्या.

लग्नाच्या साईटवरून नाशिकच्या 'लखोबा लोखंडे'चा मुलींसोबत लग्नखेळ

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : पूर्वीच्या काळी तो मी नव्हेच हा नाट्यप्रयोग खूप गाजला होता. महिलांना वेगवेगळी सोंगं घेऊन फसवून लग्न करणाऱ्या लखोबा लोखंडेवर हे नाटक बेतलं होतं. त्या लखोबाचा लेखक आचार्य अत्रे यांनी पर्दाफाश केला होता. वास्तवात घडलेली ही घटना त्यांनी नाट्याकृतीत अवतरली होती. परंतु त्याची पुनरावृत्ती झाली आहे.

या लखोबाने अनेक मुलींची विवाह करून त्यांची फसवणूक केली आहे. एकप्रकारे त्याने लग्नखेळच मांडला होता. परंतु नगरच्या पोलिसांनी त्याने कोणा दुसऱ्या फसवून लग्नबेडी टाकण्यापूर्वी त्याच्या हातात खऱ्याखुऱ्या बेड्या अडकवल्या.

अनेक मुलींना "जीवनसाथी डॉट कॉम' या वेबसाइटवरून संपर्क साधून फसवणुकीने लग्न करणाऱ्याला नगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल नंदकुमार जगताप (वय 37, रा. द्वारका, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी, कुणाल जगतापने "जीवनसाथी डॉट कॉम' या वेबसाइटवरून संपर्क करून एका महिलेशी फसवणुकीने लग्न केले. ई-मेलवरून धमकी देणारे मेल पाठवले. अनेक मुलींना वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क साधून रिलेशनशिपमध्ये राहून त्यांना फसविले, अशी फिर्याद पीडित मुलीने सायबर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला. आरोपी अभियंता असल्याने त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होती त्यामुळे तो लगेच सापडत नव्हता. त्याच्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली असता, तो नाशिक, बंगलोर (कर्नाटक), पौंडीचेरी (तामिळनाडू) याठिकाणी आरोपीपर्यंत पोहचण्यात अडथळे येत होते.

आरोपी शोधकामी तांत्रिक विश्‍लेषण केले असता, आरोपी हा बंगलोर येथे असल्याचे निष्पन्न झाले. बंगलोर (कर्नाटक) येथे जाऊन कर्नाटक पोलिसांच्या मदतीने सापळा लावून आरोपीस ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांनी दिली. 

संपादन - अशोक निंबाळकर
..... 

loading image