नवऱ्याचा खोडसाळपणा, बायकोचेच अश्लिल फोटो बनवून केले व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

पोलिसांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्‍लेषण केले असता, महिलेच्या पतीनेच हा प्रताप केल्याचे समोर आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी अकोले तालुक्‍यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

नगर : अकोले तालुक्‍यातील एकाने मोबाईलवर पत्नीचे अश्‍लिल फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. या खोडसाळ पतीला सायबर पोलिसांनी आज अटक केली. 

पीडित महिलेला एका व्हॉटस्‌ ऍप ग्रूपमध्ये ऍड करण्यात आले. त्यावर पीडित महिलेचा चेहराचा लावलेले अश्‍लिल छायाचित्रे व्हायरल केली. तसेच पीडित महिलेला ते फोटो पाठवून, फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी देत जिवे मारण्याची धमकी दिली.

या बाबत पीडितेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्‍लेषण केले असता, महिलेच्या पतीनेच हा प्रताप केल्याचे समोर आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी अकोले तालुक्‍यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

मोबाईलमध्ये दुसऱ्याच्या नावावर सीमकार्ड घेऊन हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी मोबाईल, सीमकार्ड जप्त केले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलिस कर्मचारी योगेश गोसावी, दिगंबर कारखिले, विशाल अमृते, मल्लिकार्जुन बनकर यांच्या पथकाने केली. आरोपी पती हा दहावी शिकला असून, त्याचे तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गेल्या एक वर्षांपासून पत्नी माहेरी होती. ती परत यावी, यासाठी पतीने हा उद्योग केल्याचे पोलिस तपासात समोर आले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man arrested for making wife's photo viral