

Attempt to Mediate Turns Fatal: 32-Year-Old Loses Life in Violent Clash
Sakal
अहिल्यानगर: नगर-पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी परिसरातील हॉटेल शौर्य येथे एका १६ वर्षीय मुलाने चाकूने वार करत एका तरुणाचा खून केला. रविवारी (ता. २१) रात्री उशिरा ही घटना घडली. सागर गंगाधर धोत्रे (वय ३२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने दोघांवर चाकूने वार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा एकजण जखमी झाला आहे.