अबब! माणूस एक; चोरीच्या मोटारसायकली सात 

Man one; Seven of the stolen motorcycles
Man one; Seven of the stolen motorcycles
Updated on

नगर : शहरातील वर्दळीचा फायदा घेत दुचाकीच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या दुचाकी चोरीच्या अनेक टोळ्या नगर शहरासह जिल्ह्यात कार्यरत आहेत. पोलिस पथकाकडून या टोळ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. अशाच एका दुचाकी चोरीची तक्रार तोफखाना पोलिसांना मिळाली. या दुचाकीचा शोध घेताना सह एका निनावी नंबरच्या वाहनाला हटकल्यानंतर पोलिसांना एका नवीन टोळीचा शोध लागला. 

शहरातील मोटारसायकल चोरीचा शोध घेण्यासाठी निघालेल्या तोफखाना पोलिस पथकाला अचानक घबाड हाती लागले आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्‍तीकडे चोरीच्या सात मोटारसायकली सापडल्या आहेत. त्यामुळे शहरातील मोटारसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात तोफखाना पोलिसांना यश मिळाले आहे. 

शहरातील एका मोटारसायकल चोरीची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात आली होती. या संदर्भात तोफखाना पोलिसांचे एक पथक शोध घेण्यासाठी निघाले. या पथकाला एक नंबर नसलेली दुचाकी आढळून आली. या दुचाकीला थांबविण्यास गेल्यास त्यावरील चालकाच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. म्हणून त्यांनी या व्यक्‍तीला दुचाकी सह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता मनोज गोरख मांजरे (वय 21, रा. जाधव पेट्रोलपंप नगर-कल्याण रस्ता) असे त्याने नाव सांगितले. त्याने ही दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्याच्याकडे सात चोरीच्या दुचाक्‍याही असल्याचे पथकाला अधिक तपासात आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shirdi Sweet Shop Under Scanner After Fungus Detected in Chiranjeev Peda
Farmer Asked to Pay ₹1.2 Lakh to Receive Land Acquisition Compensation; Two Held
Rahuri-Shani Shingnapur Railway Project Sparks Outrage Over Farmland Acquisition
Pandharpur Wari Reaches the World Stage with Landmark London Launch
Marathi News Esakal
www.esakal.com