esakal | शाळा, शिक्षक न पाहताच विद्यार्थी दुसऱ्या इयत्तेत! अनेक मुलांचे भविष्य अंधारात
sakal

बोलून बातमी शोधा

school

शाळा, शिक्षक न पाहताच विद्यार्थी दुसऱ्या इयत्तेत!

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (जि.अहमदनगर) : कोरोना महामारीमुळे (coronavirus) शाळेत न जाण्याचे भाग्य (दुर्भाग्य) अनेक मुलांना मिळाले. यात पहिलीच्या मुलांना शाळा, शिक्षक व मित्रांना प्रत्यक्ष न पाहता थेट दुसरीच्या वर्गात जाण्याचे भाग्य तालुक्यातील २८०१ विद्यार्थ्यांना (students) लाभले आहे. कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षापेक्षा अधिक काळ तालुक्यातील शाळा बंद आहेत. काही ठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू होत्या. मात्र, त्यात किती मुले सहभागी झाले व त्यांना त्याचा किती फायदा झाला, मुलांच्या पदरात काय पडले, हे मात्र परीक्षाच झाल्या नसल्याने झाकून राहिले. तसेच, तालुक्यात शिक्षण विभागात अधिकाऱ्यांसह शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकंदर शिक्षण विभागाकडे अद्यापही साऱ्यांचीच डोळेझाक होत आहे. मात्र, त्यामुळे तालुक्यातील अनेक मुलांचे भविष्य अंधारात आहे. (Many-children-not-reach-school-due-to-Corona-pandemic-jpd93)

अनेक मुलांचे भविष्य अंधारात

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३३४ शाळा आहेत. या शैक्षणिक वर्षात विविध गावांतील या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी सुमारे दोन हजार ५२६ विद्यार्थी पात्र होते. मात्र, फक्त दोन हजार १८० मुलांनीच पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यामुळे सुमारे ३४६ मुले शाळेच्या प्रवाहापर्यंत पोचली नाहीत. परिणामी, ही मुले शाळेपासून वंचित राहिली आहेत. तसेच, जी मुले ऑनलाइन वर्गात पोचली, त्यांना मात्र शाळा व शिक्षक पाहण्याचे भाग्य लाभले नाही. असे असतानाही त्यांना दुसरीत मात्र प्रवेश मिळाला.

....तर ही मुले पुढील वर्षी तिसरीतही जातील

शाळा व शिक्षक न पाहताच वरच्या वर्गात जाण्याचे भाग्य पहिलीच्या मुलांना लाभले असले, तरी त्यांच्या पदरात किती शैक्षणिक ज्ञान पडले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. आता ती मुले दुसरीत आहेत. मात्र, त्यांना एक-दोन असेल किंवा क-ख याचे ज्ञानच आहे की नाही, हाही मोठा प्रश्न आहे. कोरोनाची महामारी जर अशीच सुरू राहिली, तर ही मुले पुढील वर्षी तिसरीतही जातील. मात्र, त्यांना वाचता येईल का, एक-दोन व क-खचे ज्ञान असेल का, हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा: तहसीलदार पवारांच्या बदलीपूर्वीच नव्या नावाची चर्चा!

३४६ मुले शाळाबाह्य

कोरोनामुळे शाळा सुरू न झाल्याने यंदा सुमारे ३४६ मुले पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असूनही शाळेच्या प्रवाहात पोचली नाहीत. त्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या जमान्यात मूळ प्रवाहात आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

सन २०२१-२२ साठी पहिलीसाठी पात्र विद्यार्थी

मुले- १२७१

मुली- १२५५

एकूण- २५२६

प्रत्यक्ष दाखल मुले- ११०९

मुली- १०७१

एकूण- २१८०

गतवर्षी पहिलीसाठीची विद्यार्थिसंख्या

मुले- १४२४

मुली- १३७७

एकूण- २८०१

हेही वाचा: ‘अर्बन’ बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

loading image
go to top