श्री ढोकेश्वराची यात्रा भरणार नसल्याने अनेकांचा रोजगार बुडाला

सनी सोनावळे
Monday, 10 August 2020

श्रावण महिन्यात ढोकी (ता. पारनेर) येथे ढोकेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच रांगा मंदिरासमोर लागतात.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : श्रावण महिन्यात ढोकी (ता. पारनेर) येथे ढोकेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच रांगा मंदिरासमोर लागतात. 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्याकरिता ढोकेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंदच राहणार आहे. त्यामुळे यंदा भाविकांना घरच्या घरीच श्रावण मास साजरा करावा लागला. भारतीय संस्कृतीत श्रावण महिना आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

ढोकेश्वर मंदिरात या श्रावण महिन्यात जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील भाविक गर्दी करतात.दर्शनासाठी तास न तास रांगेत उभे राहून मंदिरात प्रवेश मिळवला जातो.ढोकेश्वर मंदिर देखील चार महिन्यांपासून बंद आहे. सकाळी आणि संध्याकाळी पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा केली जाते.दररोज सर्व मंदिराची साफसफाई करण्यात येते.

यात्रा भरणार नसल्याने अनेकांचा रोजगार बुडाला श्रावणमासात दर सोमवारी मोठ्या प्रमाणात महादेव मंदिरात भाविकांकडून गर्दी केली जाते.या परिसरात नारळ विक्री करणारे, तसेच बेल पत्र, फुलांचे हार यासंह अन्य साहीत्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा कोरोनाचे सावट पसरल्याने अनेकांचा रोजगार बुडाला आहे.या यात्रेतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. तिलाही आता कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा यात्रा उत्सव व पालखी सोहळा, हगामा इत्यादी कार्यक्रम बंद करण्यात आले आहे तरी कोणीही मंदिरामधे दर्शनाचा आग्रह करु नये असे ढोकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले, असल्याची माहीती सरपंच बाबासाहेब नऱ्हे यांनी दिली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many lost their jobs due to nonpayment of Shri Dhokeshwar festel