
अकोले : लग्न समारंभ साध्या पद्धतीने करावेत, त्यासाठी समाजात प्रबोधन व्हावे, ज्या कुटुंबात हुंड्यासाठी सुनेचा छळ होऊन तिचा जीव गेला असेल, अशा कुटुंबाशी नातेसंबंध ठेवू नका, लग्न किंवा इतर कार्यक्रमांत अन्नाची नासाडी होणार नाही, याची काळजी संयोजक व उपस्थितांनी घ्यावी, साधे परंतु देखणे विवाह सोहळे साजरे करण्यासंबंधी गावोगावी ग्रामसभा घेऊन विचारविनिमय करून ठराव करावेत, असा निर्णय अकोल्यात झालेल्या समाज बैठकीत एकमताने संमत करण्यात आला.