
अहिल्यानगर : मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. हुंडा घेऊ नका, देऊ नका, तसेच लग्नात डिजे व प्री-वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाह सोहळा केवळ १०० ते २०० लोकांच्या उपस्थितीत पार पाडावा, असे महत्त्वाचे निर्णय मराठा समाजाने घेतले आहेत. आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या तीन पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी ११ जणांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.