
अहिल्यानगर: मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांचे अन्न-पाण्यावाचून हाल सुरू आहेत. ही माहिती समजताच मदतीसाठी जिल्ह्यातील गावेच्या गावे पुढे सरसावली आहेत. भाकरी, ठेचा, पिठलं, पाणी, बिस्कीट, फरसाण असे पदार्थ घरोघरी जाऊन जमा केले जात आहेत. टेम्पो, ट्रकमधून हे पदार्थ मुंबईकडे रवाना करण्यात आले.