
राहुरी: सकल ओबीसी समाजातर्फे बुधवारी (ता. ३) राहुरी तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणासंदर्भात काल काढलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. हैदराबाद गॅझेट रद्द करावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला. तसे निवेदन महसूल व पोलिस प्रशासनाला देण्यात आले.