Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या जरांगेंच्या आंदोलनाला रोखण्यासाठी महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात पावले उचलली जात आहेत.