अकोल्यात माकपचे शक्तिप्रदर्शन; हजारो श्रमिक उतरले रस्त्यावर

marxist communist party march
marxist communist party marchSakal
Updated on

अकोले (जि. नगर) : शेतकरी, कामगार, कर्मचारी व आदिवासी समुदायाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अकोले शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. लॉकडाउन काळात प्रलंबित असलेल्या श्रमिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सिटू कामगार संघटना यांच्या वतीने सोमवारी (ता. नऊ) अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज माकपने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले.

मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी व श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या विविध संघटनांच्या माध्यमातून आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, बांधकाम कामगार, घरगुती कामगार, अर्धवेळ स्त्री-परिचर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. क्रांतिदिनापासून सुरू असलेल्या सत्याग्रहामध्ये आदिवासी वाड्या-पाड्यांचे रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी हे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत अकोले तहसील कार्यालयामध्ये १० ऑगस्ट रोजी सविस्तर बैठक घेतली. पिंपळगाव खांड येथील ठाकरवाडीला रस्ता व वीज, तसेच फोफसंडी येथील आदिवासी वस्तीसाठी फोफसंडी ते कोंबड किल्ला रस्ता व कोंबड किल्ला पायथ्याशी असणाऱ्या मुठेवाडीला विजेची व्यवस्था, खडकी येथील आदिवासी वाडीला वीज, हे सर्व प्रश्न आदिवासी विकास निधी व आमदार निधीतून मार्गी लावण्याबद्दलचे ठोस आश्वासन आमदार किरण लहामटे यांनी दिले.

marxist communist party march
नाशिक : लाच प्रकरणात झेडपीच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर फरार

या कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व परवानग्या तातडीने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली. याबाबतचे सर्व प्रस्ताव आंदोलकांसमक्ष संबंधित यंत्रणेकडे जमा करण्यात आले.

आंदोलकांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनातील मागण्या मान्य झाल्याने शेतकरी व श्रमिकांनी जोरदार जल्लोष केला. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, जुबेदा मणियार, आराधना बोराडे, प्रतिभा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

marxist communist party march
"देशाला स्वातंत्र्य मिळाले; स्वराज्य नाही" - तुषार गांधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com