
संगमनेर : दोन महिन्यांपूर्वी झेंडूच्या रोपांची लागवड केली, चांगले बाजारभाव मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, फुले तोडण्यास आली आणि कवडीमोल भाव झाला. त्यामुळे जवळपास दोन एकर झेंडूच्या फुलांवर रोटाव्हेटर मारण्याची वेळ आली. ही व्यथा चंदनापुरी (ता. संगमनेर) येथील राजेंद्र अंबुजी रहाणे या झेंडू उत्पादक शेतकऱ्याने मांडली आहे.