बाजार समित्या ३१ मेपर्यंत बंद, आज होईल शेतमालाची विक्री

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची माहिती
कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद
कृषी उत्पन्न बाजार समित्या बंदFILE PHOTO

नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बुधवारपासून (ता. 19) 31 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. (Market committees in Nagar district closed till May 31)

कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद
"भोळ्या भाबड्या आईबापाला तहसीलदार काय असतो हेही माहीत नव्हतं..." पण आज लेकानं करून दाखवलचं! 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बाजार समित्यांमध्ये शेतकरी व ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास हे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. नगर शहरातील बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात सरासरी दोन ते अडीच हजार रुग्ण रोज नव्याने आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय आपत्ती निवारण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आज (ता. 18) फक्‍त एक दिवस बाजार समिती सुरू राहणार आहे. रात्री 12 नंतर 31 मेपर्यंत या बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.(Market committees in Nagar district closed till May 31)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com