esakal | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे... पिकाचे नुकसान झाल्यास ‘येथे’ द्या त्वरीत माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Pradhan Mantri Fasal Bima Yojana appeals to farmers to provide information within 72 hours

शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजना’ सुरु केली.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे... पिकाचे नुकसान झाल्यास ‘येथे’ द्या त्वरीत माहिती

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजना’ सुरु केली. याचा लाभ घेण्यासाठी पीकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासात कृषी कार्यालय किंवा विमा कंपनीला टोल फ्रि क्रमांक किंवा ॲपवरुन माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे ही योजना अभिनव ठरत आहे. ‘एक देश एक योजना’ या संकल्पनेवर ही पीक विमा योजना आधारित आहे. या योजनेत यापूर्वीच्या सर्व योजनांमधील त्रुटी दूर केल्याचा दावा केला जात आहे. या योजनांमधील चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. टोल फ्रि क्रमांकावर माहिती देण्यासंदर्भातील ट्विट प्रधान मंत्री फसल विमा योजना येथे करण्यात आले आहे. यामध्ये म्हटलं आहे की, ‘प्रधानमंत्री फसल योजना ही पिकांना संरक्षणात्मक संरक्षण देणारी आहे. आपल्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासाच्या आता विमा ॲपवर किंवा कृषी कार्यालय किंवा विमा कंपनीच्या टोल फ्रि क्रमांक यावर माहिती द्यावी’.

प्रधानमंत्री फसल विमा योजना ही ‘एक पीक एक योजना’ या संकल्पनेवर आधारित आहे. खरीप हंगामातील तूर, कांदा, उडीद, मका, भात, कारळे, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांसाठी ही योजना लागू आहे. याची माहिती ॲपवरही देण्यात आली आहे. या ॲपमध्ये पीक नुकसानीची पूर्वसूचना यावर क्लिक केल्यानंतर विचारलेली माहिती द्यावी लागत आहे. वेगवेगळ्या पिकांना किती विमा भरायचा याची माहिती यामध्ये आहे.

शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी भरायची रक्कम फारच कमी आहे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना संपूर्ण विमा रक्कम देण्यासाठी विमा हप्त्याची उर्वरित रक्कम सरकारतर्फे जमा केली जाते. या योजनेत शेतकऱ्यांसाठी सर्वात कमी दर असतील आणि उर्वरित भार हा सरकारद्वारे भरला जातो. तो भार 90 टक्क्याहून अधिक असला तरी तो सरकारच भरते.

पूरामुळे नुकसान झाल्यास त्याचा विमा या योजनेत मिळतो. पीक कापणीपर्यंत आल्यानंतर चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना यातून मदत मिळते. यापूर्वी हप्त्याच्या रकमेवर मर्यादेची तरतूद असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा दाव्यापोटी कमी रक्कम मिळत होती. हप्ते अनुदानावरील सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी या मर्यादेची तरतूद होती. आता ही मर्यादा काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही वजावटीशिवाय विमा दाव्याची संपूर्ण रक्कम मिळते.

शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी पहिल्यांदाच योग आकलन व तत्काळ मदत प्रदान करण्यासाठी मोबाईलसह इतर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाविलंब भरपाई मिळणार आहे.

loading image
go to top