
जामखेड : चौंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून, सूतगिरणीची उभारणी आणि चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणांना गती मिळणार आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या व्यावसायिक चित्रपट निर्मितीसाठी देखील एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.