
अहिल्यानगर : ध्येय मल्टिस्टेटच्या सुमारे सात कोटी ६० लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी मल्टिस्टेटच्या कर्जत, राशीन, कुळधरण, बिटकेवाडी या शाखेत छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक जप्त केले आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होऊन अनेक महिने उलटले, तरी या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध तोफखाना पोलिसांना लागलेला नाही.