esakal | खरे तर आता जनता संचारबंदीची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

The mayor opinion is that there is a need for a curfew in Kopargaon now

शहर व तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठी घबराट उडालेली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असून अनेक बळी पडत आहेत.

खरे तर आता जनता संचारबंदीची गरज

sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : शहर व तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठी घबराट उडालेली आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत असून अनेक बळी पडत आहेत. अनेक परिवार कोरोनापिडीत झाल्यामुळे जनता सैरभैर झालेली आहे. कोणत्याही नागरिकांचा कोरोनामुळे अकाली बळी जाऊ नये, कुटुंब उघड्यावर येऊ नये, यासाठी खरे तर आता जनता संचारबंदीची गरज आहे. असे मला तरी वाटते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी केले आहे.

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, काहींना माझे म्हणणे मान्य नसेल तर माझा कुठलाच आग्रह नाही. शासन प्रशासनाची भूमिका पुन्हा लॉकडाऊन करण्याची नाही. पण धोका वाढलेला आहे. हे शंभर टक्के सत्य आहे. पुन्हा जनता संचारबंदी लागू करावी कि नाही यासाठी विचारविनिमयासाठी नगरपालिकेच्या कार्यालयात व्यापक बैठकही घेतली होती.

शहराचा प्रथम नागरिक म्हणून अशा संकटात सर्वांशी चर्चा करावी. हा एकमेव हेतू होता. कुठलाही निर्णय सहमतीने व्हावा, असे मला नेहमीच वाटते. एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. त्या बैठकीत उपस्थित व्यक्तींपैकी काहींनी जनता संचारबंदी करावी, असे मत मांडले. तर अनेकांनी आर्थिक अडचणी वाढतात म्हणून संचारबंदी सध्या नको, असे विचार मांडले. पण आता संपुर्ण कोपरगाव शहरच कोरोनाग्रस्त होते कि काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जनतेत, छोटे मोठे व्यावसायिक,व्यापाऱ्यात घबराट उडालेली आहे.ज्या कुटुंबात रुग्ण असतात त्यांची मानसिक व आर्थिक ओढाताण फारच भयानक आहे.गरिबांनी उपचारासाठी पैसे आणायचे कुठून हाही प्रश्नच आहे.

सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वजण बांधील आहोत.निदान या परिस्थितीत तरी एकमेकांवर टिका टिप्पणी करून कुणीही वातावरण दुषित करणे योग्य होणार नाही.अहमदनगर मध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला दोन दोन दिवस नंबर लागत नाही.आपल्या कोपरगाववर अशी परिस्थिती येऊ नये इतकीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे.

ज्या कुटुंबातील काही बळी गेले,जे कोविडग्रस्त ऍडमिट आहेत त्यांच्या मनस्थितीचा व शहरावर आलेल्या या भीषण परिस्थितीचा सर्वांनीच गंभीरपणे विचार करावा हिच अपेक्षा.या विषयावर कुणी माझ्यावर टिका केली तरी हरकत नाही,कारण कुणी अकाली बळी जाऊ हिच इच्छा आहे असे ही शेवटी वहाडणे यांनी म्हंटले आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर