esakal | राहाता येथे नगराध्यक्षांचेच धरणे मग आरोग्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

The mayor's protest at Rahata

शहरातील तरुण तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गेला असता, विनंती करूनही त्याची तेथे अँटीजेन चाचणी करण्यात आली नाही. त्याला आज शिर्डीला जाऊन ही चाचणीचा सल्ला देण्यात आला.

राहाता येथे नगराध्यक्षांचेच धरणे मग आरोग्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता ः कोविडच्या अँटीजेन चाचणीसाठी शिर्डीला हेलपाटे मारावे लागू नयेत. येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणीची सुविधा सुरू करावी, या मागणीसाठी आज नगराध्यक्ष ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी रुग्णालय परिसरात दोन तास धरणे आंदोलन केले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत ही माहिती गेल्यानंतर सूत्रे हलली. तहसीलदार कुंदन हिरे यांनी मध्यस्थी केली. या रुग्णालयात दररोज दोन तास ही सुविधा सुरू ठेवण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

हेही वाचा - कोयनेत पाऊस बरसला

डॉ. पिपाडा म्हणाले, की शहरातील तरुण तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गेला असता, विनंती करूनही त्याची तेथे अँटीजेन चाचणी करण्यात आली नाही. त्याला आज शिर्डीला जाऊन ही चाचणीचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर आपण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरांना युवकाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी करण्याची विनंती केली. त्यास डॉक्‍टरांनी नकार दिला.

चाचणीसाठी सर्वांना शिर्डीला जावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर नगराध्यक्ष ममता पिपाडा यांच्यासह रुग्णालयाच्या आवारात दोन तास धरणे आंदोलन केले. मंत्री टोपे यांच्या कानावर तक्रार घातली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखर्णा यांनी येथील डॉक्‍टरांशी संपर्क साधला. त्यानंतर येथील रुग्णालयात ही सुविधा दररोज सकाळी नऊ ते अकरा या वेळेत ही चाचणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. युवकाची चाचणी केली असता, तो पॉझिटिव्ह निघाला. त्यातून या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top