अभिमान बाळगून वैद्यकीय सेवा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

medical service Ayurveda meeting

अभिमान बाळगून वैद्यकीय सेवा करा

शिर्डी : आयुर्वेदाला सर्वाधिक चांगला काळ आला. `गर्व से कहो हम वैद्य है’, या उक्तीप्रमाणे वैद्य असल्याचा अभिमान बाळगून वैद्यकीय सेवा करा. रेल्वेपासून ते सैन्यापर्यंत विविध सरकारी क्षेत्रांत आयुर्वेद उपचारपद्धतीला संधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पदमश्री वैद्यराज देवेंद्र त्रिगुणा यांनी केले.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या आयुर्वेद पर्व संमेलनास शुक्रवारी कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठात ओम गुरुदेव माऊली, संत परमानंद महाराज, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त हनुमंत भोगळे व प्रकाश भट यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. राज्यातील दोन हजारांहून अधिक वैद्य तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष राकेश शर्मा, महामंत्री एस. एन. पांडे, संयोजक व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष रामदास आव्हाड आदी उपस्थित होते.

त्रिगुणा म्हणाले, की दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी आयुर्वेदाला चालना देणारे निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष मंत्रालयाची स्थापना केली. जगभरातील विविध देशांत आयुर्वेद पोचविला. राजाश्रय लाभल्याने आयुर्वेदाला चांगले दिवस आले. दिल्लीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयुर्वेद रुग्णालय सुरू झाले. परदेशी विद्यार्थी आयुर्वेद शिक्षणासाठी भारतात येत आहेत. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामदास आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमीत कमी वेळात आयुर्वेद पर्वाचे उत्तम आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराचे धोरण घेतले. त्यांच्याच पुढाकारातून जगाने योग दिनास मान्यता दिली.

- स्नेहलता कोल्हे, माजी आमदार

आयुर्वेद, ध्यान आणि योग यांचे नाते जवळचे आहे. ऋषिमुनींनी संशोधन ती शोधली आहे. ध्यानधारणा नियमित केली तर जीवनात आनंद आणि उत्साह टिकून राहतो. आत्मा मालिक रुग्णालयात वैद्य रामदास आव्हाड यांच्यासाठी एक स्वतंत्र आयुर्वेद उपचारपद्धती कक्ष सुरू केला जाईल.

- संत परमानंद महाराज

देशभरातील ५७ नामांकित आयुर्वेद औषधी कंपन्यांनी प्रदर्शन आयोजित केले. औषधी व दुर्मिळ वनस्पतींचे प्रदर्शन आणि दोन हजार वैद्यांची उपस्थिती, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.

- रामदास आव्हाड,संयोजक व अध्यक्ष, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन

Web Title: Medical Service Ayurveda Meeting Attendance Of Two Thousand Physicians Shirdi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..